भाटिवडे येथील महिलांना समर्थ गॅस एजन्सी पिंपळगांव यांचे मार्फत उज्वला गॅस वितरण

836

गारगोटी प्रतिनिधी :-
गेल्या ५ वर्षात मोफत उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महीलांच्या जीवनात नंदनवन फुलवल्यामुळेच या वेळी सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर आले. उज्वला योजनेबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी मोदी सरकार व महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या असुन त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांनी केले.
भाटीवडे ता. भुदरगड येथील महीलांना समर्थ गॅस एजन्सी पिंपळगांव यांचे मार्फत उज्वला गॅस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी माजी सरपंच मा. अनंत डोंगरकर (सर ) हे होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील पुढे म्हणाले कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे महान कार्य हाती घेतले असुन त्यांच्या या कार्याला साथ देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहू या. यावेळी माजी सरपंच अनंत डोंगरकर यांचेही भाषण झाले.
यावेळी भाजयुमोचे अध्यक्ष रणजित आडके, चिटणीस विनायक देसाई,समर्थ गॅस एजन्सीचे संजय घोडके, मॅनेजर कपील गूरव, उपसरपंच सुवर्णा हाळवणकर, युवराज कांबळे, बाळासो साळोखे,
पोलीस पाटील उत्तम माणगांवकर, किरण हाळवणकर, सतीश गुरव, भिकाजी सातपूते, ग्रामसेविका स्मिता पाटील, भिकाजी सातपूते, अरुण कडव, विनायक सातपूते, दिपाली कांबळे, रेखाताई दबडे, सविता मानगांवकर, अश्विनी नाटळे, एम.के. कडव, शंकर हाळवणकर, संजय नलवडे, अजित दबडे, दयानंद देसाई, अमोल गुरव, राहूल नलवडे, कपील गूरव, आदीनाथ गुरव, यशवंत देसाई, सातापा सुतार, सागर नलवडे, आदींसह नागरीक व महीला मोठया संखेने उपस्थीत होते.
स्वागत युवक नेते सचिन हाळवणकर यांनी केले तर आभार भाजपा शाखाध्यक्ष चंद्रकांत नलवडे यांनी मानले…