मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरात आनंदोत्सव

0
299

कोल्हापूर प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या आनंदात ऐतहासिक दसरा चौक येथे विविध पक्ष संघटना, नागरीक, यांच्याकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून, साखर-पेढे वाटून, शिवरायांच्या आणि शाहूंच्या नावाचा जयघोष करत सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. दुपारी न्यायालयाकडून मराठा समाजाला १३% आरक्षण मिळाल्याचे स्पष्ट होताच, नागरीकांनी दसरा चौकात गर्दी केली. अनेकांनी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी साखर व पेढे वाटण्यात आले.
यावेळी आखिल भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, हा विजय सर्व मराठा समाजाचा विजय आहे. हा विजय आजपर्यंत काढलेल्या त्या सर्व मोर्चाचा आहे, सर्व आंदोलकांचा आहे, आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्यांं शहिदांचा आहे, आणि त्यांनाच आम्ही हा विजय आर्पण करत आहोत. त्यामुळे जास्त जल्लोष न करता शांततेत हा आनंद उत्सव साजरा करत आहोत. माननीय न्यायालयाचा आदर करतो, पण आमची मागणी १६% आरक्षणाची होती, सध्या १३% मिळाले आहे, त्यामुळे आमची १६% आरक्षणाची मागणी यापुढेही कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर अनेकांनी हा विजय आरक्षणाचे जनेते छ. शाहूंचा विजय असल्याचे सांगितले, याचे कोणत्याही राजकारण्यांनी श्रेय घेऊ नये, हा सर्व जनतेचा विजय असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here