मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक;न्यायालयात आरक्षण टिगले

0
447

मुंबई – अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले आहे. मात्र, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नसून ते आरक्षण 12 आणि 13 टक्के असणार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.  या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here