कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

0
123

कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या दृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तयारी झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी दिली.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, विभागीय वनसंरक्षक सूर्यकांत काटकर आणि विभागीय वनअधिकारी दीपक खाडे उपस्थित होते.
बेन म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार, साताऱ्यासाठी १ कोटी २४ लाख १ हजार, सांगलीसाठी ७२ लाख ३० हजार, सिंधुदुर्गसाठी ४१ लाख ६६ हजार आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४८ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागासोबतच सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था यांच्याकडून हे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यात येणार आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये खड्डे खुदाईची कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये २३ ओढ्यांच्या दुतर्फा प्रायोगिक तत्त्वांवर ५० हजार बांबूची रोपे लावण्यात येणार आहेत. या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे रोपांची विक्री केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here