महादेवराव महाडिक यांच्या आव्हानामुळेच माझे मताधिक्य वाढले: खासदार मंडलिक

0
973

गारगोटी (प्रतिनिधी )
कोल्हापूरच्या शिवाजी चौकात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बोलताना अश्वमेध अडवून दाखवा असे आव्हान दिले होते ते आव्हान जनतेने पेलले आणि स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले त्यामुळेच माझे मताधिक्य वाढले असे प्रतिपादन खासदार मंडलिक यांनी केले.
खासदार झाल्यानंतर मल्टीस्टेट विरोध करणारे पहिले पत्र मीच सरकार ला सादर केले असुन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्टार प्रचारक होवून धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ चार पाच सभा मतदारसंघात घेतल्या असत्या तर किमान पाच लाखाचे मताधिक्य आपण गाठू शकलो असतो असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गारगोटी ता.भुदरगड येथे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा सर्वपक्षीयांच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई होते.
खासदार मंडलिक म्हणाले, भुदरगड तालुका मागास आहे ही संकल्पना आपण मोडीत काढूया या तालुक्याच्यादृष्टीने महत्वाचे असणार्या शिवडाव सोनवडे घाटाचे टेंडर दिवाळी पर्यन्त मंजूर होईल.हा घाट झाल्यास विकासाला चालना मिळेल पण त्याचबरोबर रोजगाराच्या ही संधी उपलब्ध होतील.भुदरगड,आजरा, चंदगड,राधानगरीतील लोकांना भेडसावणारा जंगली प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतर्क राहू.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, सर्वच गावांनी चांगले काम केले पलीकडे खुप मोठी माणसे असतानाही भुदरगडाचा सिंहाचा वाटा राहिला. दादांच्या विजयात नामदार चंद्रकांत दादांनी यांचे योगदान मोठे राहिले.स्वर्गीय मंडलीकांचा आर्शीवाद आणि कार्यकर्त्यांचे संघटन चांगले राहिले त्यामुळेच खुप चांगला प्रतिसाद मिळाला. योग्य तो निधी लावून कामे करावीत. आमदार सतेज पाटील यांच्यामुळे मदत झाली.मतदारसंघातअजून काम करावे लागेल गावच्या व परिसराच्या विकासाचे ईर्ष्या ठेवून काम करूया तरच उत्तुंग काम होईल.
माजी उपसभापती सत्यजित राव जाधव म्हणाले, आम्ही धाडसी निर्णय घेवून आपल्याला पाठींबा दिला दिला,आम्हाला महाडिक नको होते त्यामुळे आमचे कार्यकर्ते सक्रिय होवून मताधिक्य दिले.
काॅग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु असून मतदारसंघातील काॅग्रेसनी मताधिक्य दिले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्ह्यात तळ ठोकून मताधिक्य देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
खासदार मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला तर तालुक्यातील सर्वाधीक मताधिक्य देणार्या वाघापूर, नाधवडे, मडिलगे सह अनेक गावांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत यांनी प्रविणसिंह सावंत, बिद्रीचे माजी संचालक के जी नांदेकर,दत्ताजीराव उगले,बी.एस देसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमास भाई आनंदराव आबीटकर, सभापती सौ.स्नेहल परीट, उपसभापती श्रीमती किर्ती देसाई, सुनिल निंबाळकर, के.जी.नांदेकर, नंदकुमार ढेंगे,सुरेश नाईक, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, सचिन घोरपडे, मधुकर भोई, सरिता वरंडेकर, तानाजी जाधव,भाजपाचे बाजीराव देसाई,सुनिल जठार, किशन जठार, कल्याण निकम, शिवाजी ढेंगे, अविनाश शिंदे आदीसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दत्ताजीराव उगले यांनी केले तर सुत्रसंचालन विद्याधर परीट व धनाजी खोत यांनी केले. आभार संग्रामसिंह सावंत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here