वाहनाच्या काचेवरची काळी फिल्म तात्काळ काढून टाका : अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर

0
228

नागपूर : काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनाच्या काचेवरची काळी फिल्म तात्काळ काढून टाका, असे आदेश वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केले आहेत. नागपूरसह राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त कार्यालयांना शनिवारी हे आदेश मिळाले आहे. त्यामुळे काळी फिल्म लावून धावणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून राज्यभरात विशेष कारवाईची मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे.केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी नाही. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात.गैरप्रकारात गुंतलेलली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. २६५/ २०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here