अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू : पंकजा मुंडे

336

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू,असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ द्यावी, सेवा निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद, कामावरील वेळेची मर्यादा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मंत्री पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या