शिवसेना नेमणार नवीन एक लाख शाखाप्रमुख..

0
250

मुंबई : शिवसेना राज्यात एक लाख नवे शाखाप्रमुखांची नेमणूक करणार आहेत. ग्रामीण भागांमध्ये एक लाख शाखाप्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गावांमध्ये भगवं वातावरणं निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुखाची नेमणूक केली जाणार आहे. शाखाप्रमुखांच्या नियुक्तीवेळी कट्टर शिवसैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी या विषयीवर सविस्तर माहिती दिली . ते म्हणाले की, “येत्या 27 जुलैआधी शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही नेमणूक करताना विभागप्रमुखांनी स्वत:चे नातेवाईक नाही तर कट्टर शिवसैनिकांचा विचार करावा, असं उद्धव ठाकरेंचा आदेश आहे. नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्रे बनवण्यात येणार आहेत. तसंच ग्रामीण भागात 14 ते 27 जुलै या दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे.” आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा कार्यक्रम राबवत असल्याचं विश्वनाथ नेरुरकर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here