शिष्यवृत्ती परीक्षेत भुदरगडचा राज्यात झेंडा ,१५६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

0
306

गारगोटी-प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भुदरगड तालुक्यातील तब्बल १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. भुदरगड तालुक्याने शिष्यवृत्ती परीक्षेतील आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत या वर्षीही राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
शिष्यवृत्तीचे माहेरघर अशी भुदरगड तालुक्याची संपूर्ण राज्याला ओळख आहे. या निकालाने तालुक्याचे नाव राज्याच्या शैक्षणिक नकाशावर झळकले असून तालुक्याची गुणवत्ता कायम राहिली आहे. अधिकारी वर्गाचे योग्य नियोजन व मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व शिक्षकांचे अथक परिश्रम या सर्व घटकांच्या समन्वयाचे फलित या निकालात प्रकर्षाने दिसून आले.
खालील शाळांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे.विद्या मंदिर सोनाळी( ८ ), आदमापूर(८), दारवाड(४), निळपण(७)वाघापूर(१)गंगापूर (१),नाधवडे(१), मुदाळ(४५), पळशिवणे(४),शेळोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here