अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या वतीने वंचिताना न्याय: तहसीलदार कदम

0
112

गारगोटी प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक संघटनेच्या वतीने वंचिताना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते.कायद्याच्या आधारे काम करणारी ही संघटना आहे. या संघटनेचे काम स्तुत्य आहे. असे प्रतिपादन भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांनी केले.
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मौनी विद्यापीठ गारगोटी(ता.भुदरगड) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीने आयोजित करणेत आलेल्या निवासी प्रशिक्षण अभ्यासवर्गाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई,उद्योगपती पारस ओसवाल,अजय भोसरीकर मौनी विद्यापीठ संचालक श्री डॉ आर.डी. बेलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांनी केले
दोन दिवस सुरु असणा-या या अभ्यासवर्गात पहिल्या दिवशी वीज कायदा आणि वीज ग्राहकांचे हक्क या विषयावर जावेद मोमिन,ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर अजय भोसरीकर,यांनी मार्गदर्शन केले.सांयकाळी सहा वाजता सर्व तालुक्याने पी.पी.टी.चे सादरीकरण केले.
दुस-या दिवशी पहाटे ६ वा.ह.भ.प.अशोक कौलवकर यांच्या चिंतनाने कार्यशाळेस प्रारंभ झाला.दुस-या दिवशीच्या प्रशिक्षण कायर्कमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच च्या अध्यक्षा सविता भोसले होत्या. ९.३० वा.ॲड.सदानंद मानकर यांनी ७/१२,८ अ,वारसा नोंदी या विषयावर मार्गदर्शन केले.दु.१२.३० वा.जबाबदार कार्यकर्ते व प्रशासन या विषयावर ॲड.तुषार झेंडे यांचे मार्गदर्शन झाले.
या कार्यशाळेची सांगता आमदार प्रकाश अबिटकर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संचालक प्रविणसिंह सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या वेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की,चांगल्या गोष्टी दुर्दैवाने दुर्लक्षित असतात.अशा दुर्लक्षित गोष्टीकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत लक्ष देत असते.लोकप्रतिनिधी नी अशा गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.जबाबदारीची जाणीव नसल्याने आपण शासन व्यवस्थेला दोष देतो.अशा शिबीरांचा लोकप्रतिनिधी नी ही लाभ घेण्याची गरज आहे.अशा गोष्टीचा प्रसार आणि प्रचार नसल्याने मागे पडतात.असे ते म्हणाले.
या अभ्यास शिबीरास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री नाथजी पाटील, मौनी विद्यापीठ सदस्य श्री अलंकेश कांदळकर, सरपंच संदेश भोपळे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी,मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्य एन.ए.कुलकर्णी,श्री प्रसाद बुरांडे, जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, सचिव अनिल जाधव,महिला पंचायत च्या जिल्हा अध्यक्षा ॲड.सुप्रिया दळवी, भुदरगड तालुका रमेश पाटील, युवराज पाटील, महिला तालुका अध्यक्षा ऐश्वर्या पुजारी, सौ. मनाली स्मार्त, सागर पोवार, दयानंद सुतार, कुंडलिक शिरसेकर आर.पी. पाटील , संग्राम पोफळे, आदि.सह जिल्ह्यातील सुमारे २०० महिला व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here