सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य:मुख्यमंत्री

0
40

मुंबई:
राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली आहे. राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायदा सक्तीचा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये मांडला होता. काही साहित्यिक मराठी भाषा शिकवली जावी म्हणून येत्या २४ जूनला आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी सीबीएसई, आयसीएसई, एसएससी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवण्यासाठी कडक कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here