मोफत रेल्वे प्रवासाऐवजी थेट महिलांच्या बँक खात्यांत अनुदान द्यावे : ई. श्रीधरन

0
48

दिल्ली:
मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि दिल्ली मेेट्रोचे पहिले प्रबंध निदेशक असणारे ई. श्रीधरन यांनी महिलांना मेट्रो प्रवास मोफत देण्याचा केजरीवाल सरकारचा निर्णय नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे. मोफत प्रवासाऐवजी थेट महिलांच्या बँक खात्यांत अनुदान देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. श्रीधरन यांनी या योजनेविषयी चिंता व्यक्‍त करताना 10 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या योजनेविषयी चिंता व्यक्‍त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधरन यांनी पत्रात लिहिले आहे की, जर कुठल्याही सरकारला लोकांना मोफत मेट्रो प्रवासाची सुविधा द्यायची असेल, तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत तिकिटाचे पैसे देणे सर्वात चांगला उपाय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here