आता एटीएममध्ये रक्कम नसल्यास संबंधित बँकेवर कारवाई

0
108

नवी दिल्ली : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर अनेकदा रक्कम नसल्याचे फलक एटीएम मशिन्सवर दिसत असतात. त्यामुळे संबंधित खातेदाराला रक्कम न मिळाल्याने निराशा होत असे. मात्र, आता एटीएममध्ये रक्कम नसल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

इंग्रजी वेबसाईट झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले. एटीएममध्ये रक्कम नसल्याचे प्रकार अनेकदा घडतात. पण ही रक्कम पुन्हा भरण्यासाठी काही तासांचा कालावधी जातो. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले. आरबीआयने अशा एटीएममध्ये रक्कम पूर्णपणे रिकामी झाल्यास तीन तासांमध्ये पुन्हा भरावी, असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here