अमित शहांकडेच भाजपचे अध्यक्षपद राहणार

0
217

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच भाजपचे अध्यक्षपद राहणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यांनी या ३ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्षपदी राहावे, असा नेत्यांचा आग्रह आहे.

अमित शहा यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्वच नेत्यांनी अमित शहा यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, असा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here