डीएड अभ्यासक्रमासाठी राज्य भरातून आडीच हजार अर्ज

0
149

पुणे: डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १६ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे. तसेच १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी २० जून रोजी प्रसिध्द केली होणार असून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुणवत्ता यादीवर हस्तक्षेप स्वीकारले जातील. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून आत्तापर्यंत राज्य भरातून केवळ आडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. येत्या १६ जून रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी प्रशिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here