भारतीय बनावटीच्या एचएसटीडीव्ही व्हेईकलची यशस्वी चाचणी

0
107

ओडिशा – संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘हायपरसोनिक टेक्‍नोलॉजी डेमोन्स्ट्रेटर व्हेईकल’ची बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरून पहिली चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात ‘डीआरडीओ’ने बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून ही या लॉंच व्हेईकल (एचएसटीडीव्ही) ची चाचणी घेतली. भविष्यातील अंतराळ मोहिमांना डोळ्यासमोर ठेवून ‘डीआरडीओ’ने या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान असलेल्या व्हेईकलची चाचणी घेण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. विविध रडार, टेलिमेट्री स्टेशन आणि इलेक्‍ट्रो ऑप्टिकल सेन्सरनी याचा पाठपुरावा केला असून त्याबाबतचा डाटा गोळा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here