प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु: प्रतिपादन चंद्रकांत पाटील

0
270

कोल्हापूर:
पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य महसूल, कृषी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

येथील शेंडा पार्कातील कृषी संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ‘शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी सकाळी झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सूतोवाच केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here