बँक ऑफ महाराष्ट्र व युनियन बँकेचा ५८७ कोटींचा कर्ज घोटाळा

0
315

नवी दिल्ली:बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक ऑफ इंडियातील 587.55 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनंतर गुजरातमधील फरार हिरे व्यापारी व ‘विनसम डायमंड्स’ कंपनीचा मालक जतिन मेहता याच्यावर सीबीआयने बँक कर्ज घोटाळाप्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
सीबीआयमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार जतिन मेहता याने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 323.40 कोटींचा, तर युनियन बँकेत 264.15 कोटींचा कर्ज घोटाळा केला आहे. सीबीआयने याप्रकरणी जतिन मेहता, त्याच्या ‘विनसम डायमंड्स ऍण्ड ज्वेलरी’ या हिरे कंपनीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here