गारगोटीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
67

गारगोटीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गारगोटी. ता. १२ (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध जिनियस क्लासच्या वतीने दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी देवेकर यांचा सत्कार पोलीस निरीक्षक उदय डुबल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उदय डुबल म्हणाले, दहावी नंतरचे वय अल्लड आणि अवखळ असते,याच वयात मुलांनी आपले जीवन घडवायचे असते,आमिषे, प्रलोभने आपल्याला खुणावत असतात, पण त्यापासून दूर राहून मुलांनी आपले उज्वल भविष्य घडवावे. असे सांगून या क्लासने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून इतर मुलांसमोर आदर्श ठेवला असलेचे सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली, दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेला पृथ्वीराज चव्हाण , तसेच मुग्धा भोसले, प्राजक्ता केळकर, नूतन खोत, स्नेहल भोसले, प्रतिक्षा गडकरी, ॠतुजा देसाई, शुभम शेळवाडकर, सानिका कासार, ॠतुजा पाटील, साक्षी सुतार, अथर्व आरेकर, अंकिता सुतार, नयना दोरूगडे, हर्षल सावंत, हर्षवर्धन चौगुले व रितेश देवेकर यांचा यावेळी भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक क्लासचे संचालक प्रा अतुल बुरटुकने यांनी केले. यावेळी सत्ताप्पा पाटील,धनाजी आरडे, प्रा.आनंद चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण यांची भाषणे झाली. आभार सृष्टीराणी पाटील हीने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here