‘वायू’ चक्रीवादळाचा गुजरातसह महाराष्ट्राला धोका

0
314

मुंबई प्रतिनिधी: ‘वायू’ चक्रीवादळ 13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे वादळ 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे जात आहे. या पार्शवभूमीवर हवामानखात्या कडुन हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात प्रशासन या वादळापासून लोकांना वाचविण्यासाठी सज्ज झाले आहे. आपतकालीन परिस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.गुजरातबरोबर महाराष्ट्रालाही या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here