पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर

0
311

गारगोटी -प्रतिनिधी
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य कडगाव ता भुदरगड येथे रक्तदान शिबिर
आयोजन केले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे

  भाजपचे युवा नेते दिगंबर देसाई यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते   गावातील तब्बल  ६१ रक्तदात्यानी उस्फूर्त पणे रक्तदान करुन सामाजिक  कर्त्यव्याला हातभार लावला या साठी राजश्री छ्त्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छ्त्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर यांनी रक्त संकलन केले.
     येेेथील विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये प्रत्येक युवकाने उस्फुर्तपणे रक्तदान केले यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते  रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले  या  प्रसंगी प्रवीणसिंह सावंत म्हणाले दिगंबर देसाई यांनी पश्चिम भुदरगड मध्ये समाजकारणातून राजकारण ह्या सूत्रानुसार प्रत्येक वर्षी  दादांंच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर भरवून तसेच हुशार गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन समाजात एक नविन आदर्श निर्माण केला आहे. दिगंबर देसाई यांच्या  सामाजिक कार्यामुळे कडगाव जिल्हा परिषद व पंचायत समीती मतदार संघात राजकीय कलाटनी मिळणार आहे.

यावेळी भाजपचे राधानगरी भुदरगड आजरा युवानेते देवराज बारदेस्कर,  वेंंगरुळ सरपंच एन के  देसाई ,  युवराज पाटील,व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here