चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या बदल्या:अमल मित्तल

0
165

कोल्हापूर : गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिलीया सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेत

गेल्या वर्षी परजिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी जे फॉर्म भरले होते, त्यामध्ये ‘नोकरी सुरू’ या कॉलममधील तारखा चुकीच्या लिहिल्या होत्या. त्यामुळे या सर्वांना सोयीची बदली ठिकाणे मिळाली होती. दरम्यान, राज्यातील अनेक शिक्षकांनी अशा प्रकारे चुकीची माहिती भरल्याने तसेच चुकीचे अंतर दाखविल्याने अशा सर्वांची एक वेतनवाढ रद्द करण्याचा आणि पुन्हा त्यांची बदली करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता.अन्य जिल्हा परिषदांमध्ये कारवाई झाल्याने कोल्हापुरात कारवाई का नाही, अशी विचारणा सुरू झाली. यानंतर चौकशी करून, सुनावणी घेऊन यातील ११८ शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here