पानसरे हत्या प्रकरणांमधील संशयित आरोपी शरद कळसकरला अटक

0
103

कोल्हापूर, (प्रतिनिधी) – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी असलेल्या शरद कळसकर याला कोल्हापूर ‘एसआयटी’ने अटक केली असून त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती आज कोल्हापूर एसआयटीने कोर्टाला दिली आहे.

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी आठ आरोपींची नावे समोर आणली आहेत. यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक दाखवली असून विनय पोवार आणि सारंग अकोळकर हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.

पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी कळसकर याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here