तृतीयपंथीय चमचमचा मृत्यू

0
566

नागपूर : तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे.
कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तृतीयपंथीयांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. तेव्हापासून चमचम अत्यवस्थ अवस्थेत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here