गारगोटीत ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप

0
281

गारगोटीत ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप
गारगोटी, ता. १० : येथील ग्रामपंचायतीतर्फे १५० दिव्यांगाना जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, सरपंच संदेश भोपळे प्रमुख उपस्थित होते.
रेश्मा देसाई म्हणाल्या, ग्रामपंचायत दरवर्षी आपल्या बजेटमधून दिव्यांगांसाठी विशेष तरतूद करते. दिव्यांग बांधवांनी ही रक्कम व्यवसायासाठी खर्च करून स्वावलंबी बनावे.
राहुल देसाई म्हणाले, समाजातील दिव्यांग व्यक्तींना आपल्यख हक्क आणि कर्तव्याची जाणीव करुन द्या. त्यांना समाजिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घ्या. त्यांचे आत्मभान जागृत करण्यावर भर द्यावा.
सरपंच संदेश भोपळे यांनी स्वागत केले. प्रविणसिंह सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सचिन देसाई, सदस्य प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, जयवंत गोरे, रुपाली कुरळे, आशाताई भाट, मेघा देसाई, सुकेशिनी सावंत, अस्मिता कांबळे, स्नेहल कोटकर, स्मिता चौगले, राहुल कांबळे, सर्जेराव मोरे, रणधीर शिंदे, अनिता गायकवाड, विजय कोटकर प्रशांत गुरव, अजित चौगले आदी उपस्थित होते. बजरंग कुरळे यांनी सूत्रसंचालन यांनी केले.
सचिन देसाई यांनी आभार मानले.
फोटो : got101.JPG
गारगोटी : ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना अनुदान वाटपप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई. शेजारी राहुल देसाई , सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सचिन देसाई व सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here