मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील 11 रस्त्यांसाठी 15 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

0
379

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील 11 रस्त्यांसाठी 15 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर
मतदार संघातील 21.137 कि.मी. रस्त्याचे होणार डांबरीकरण.

गारगोटी प्रतिनीधी-

राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्याधर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील न जोडलेली गावे आणि लोकवस्त्या बारमाही रस्त्यांव्दारे जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दूरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जावाढीसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदार संघातील 21.137 किलोमिटर लांबीच्या रस्त्यांसाठी 15 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारित मतदारसंघ असून वाड्या वस्त्यांनी विखुरलेला असल्यामुळे रस्त्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. गेल्या 4 वर्षापासून मतदार संघातील रस्ते निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. गेली 4 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून वारंवार विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात रस्त्यांकरीता जास्तीत जास्त निधी मिळणेसाठी आवाज उठवत होतो. राज्याच्या ग्रामविकास राज्यमंत्री पंकजाताई मुंडे यांनी खास-बाब म्हणून राधानगरी-भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. या निधीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, यांच्याबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले.
या योजनेतून राधानगरी तालुक्यातील गेली क्रित्येक वर्ष दळणवळणा अभावी प्रलंबित असणारा इजिमा 61 ते माजगांव रस्ता 2.325 सुधारणा करणेसाठी 1 कोटी 76 लाख रुपये, प्रजिमा 45 ते अडसुळवाडी (आडोली) रस्ता 0.200 सुधारणा करणेसाठी कि.मी. 15 लाख 98 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भुदरगड तालुक्यातील रामा 55 ते नवरसवाडी रस्ता 1.480 कि.मी. सुधारणा करणे 1 कोटी 18 लाख, रामा 189 ते बामणे रस्ता 1.300 कि.मी. सुधारणा करणे 80 लाख 76 हजार, रामा 189 ते आंबवणे रस्ता 2.045 कि.मी. सुधारणा करणे 1 कोटी 32 लाख, वाघापूर ते गुरववाडी रस्ता 1.200 कि.मी. सुधारणा करणे 86 लाख 76 हजार, बारवे ते इंगळेवाडी रस्ता 2.100 कि.मी. सुधारणा करणे 1 कोटी 76 लाख, केळेवाडी ते भांडीबांबर रस्ता 1.975 कि.मी. सुधारणा करणे 1 कोटी 46 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
आजरा तालुक्यातील प्रजिमा 58 ते हरपवडे रस्ता 3.022 कि.मी. सुधारणा करणेसाठी 2 कोटी 41 लाख रुपये, लाटगांव ते लाटगांववाडी रस्ता 5 कि.मी. सुधारणा करणे 3 कोटी 99 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here