वाढलेल्या किरकोळ खर्चावरून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

0
134

कोल्हापूर : वाढलेल्या किरकोळ खर्चावरून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मोठा वाद झाला. विरोधकांच्या आक्षेपांना सत्ताधाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन्ही बाजूंकडून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची ५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी येथील संस्थेच्याच महालक्ष्मी सभागृहात झाली. व्हाईस चेअरमन शांताराम माने यांनी चेअरमनपदाची प्रभारी सूत्रे हातात घेऊन सभा चालविली. माजी चेअरमन एम. आर. पाटील व महावीर सोळांकुरे यांच्या नेतृत्वाखाली सभेच्या कामकाजास सुरुवात केली. व्यवस्थापक विजय बोरगे यांनी अहवालाचे वाचन केल्यानंतर सभेची सर्व सूत्रे प्रभारी चेअरमन म्हणून माने यांनी हातात घेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
विरोधकांची ताकद एकवटू नये याची तजवीज सभेआधीच सत्ताधाºयांकडून केली गेली असली तरीदेखील सचिन जाधव, वीरेंद्र काळे, मानसिंग वास्कर, शरद देसाई या विरोधी सदस्यांनी सत्ताधाºयांना सुरुवातीपासूनच कोंडीत पकडले. अहवालात किरकोळ खर्च एक लाख ९७ हजार दाखविला आहे. मूळ हेडवर खर्च असताना पुन्हा एवढा खर्च कशासाठी, असा सवाल केला.यावर चेअरमन माने यांनी ‘तुमच्याच कार्यकाळात २००७ मध्ये दोन लाखांवर किरकोळ खर्च झाला होता,’ असे बजावले. याला ‘जुने काढू नका, आताचे बोला,’ असे म्हणून जाधव यांनी जोरदार हरकत घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here