कुडित्रे यशवंत बँक दरोड्यातील आरोपींना अटक

0
194

कोल्हापूर:
बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दाखवून कोल्हापूरच्या आपटेनगर येथील यशवंत सहकारी बॅंकेवरील दरोड्यातील दोघा आरोपींना जेरबंद करण्यास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. चैनी आणि पैशाच्या हव्यासासाठी यशवंत बॅंकेतच पिग्मीचे खाते असलेला विजय रामचंद्र गौड, त्याचा साथीदार राजू नेताजी सातपुते या दोघांनी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

करवीर तालुक्‍यातील कुडित्रे येथील यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर रिंगरोड शाखेत लिपिकाला बनावट एअरगन आणि सत्तूराचा धाक दाखवून कॅश काउंटवरुन 62 हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार 30 मे रोजी भरदुपारी तीन वाजता घडला होता. या दरोड्यानंतर मोपेडवरून आलेले दोघे संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here