पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

0
263

कोल्हापूर : प्रतिनिधी
दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने राहत्या घरात ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. प्रणव सुनील जरग (वय 16, आर. के. नगर सोसायटी क्रमांक पाच) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. गेल्या काही दिवसांपासून तो इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याचे सांगत होता. प्रणव हा आई-वडील आणि भावासमवेत राहात होता. प्रणवने दहावीची परीक्षा दिली आहे. दहावीचा निकाल अद्याप लागलेला नाही.

मात्र, तो गेल्या काही दिवसांपासून पेपर अवघड गेल्याचे सांगून नाराज होता. गुरुवारी सायंकाळी आई-वडील बाजारात गेले होते. त्याचा भाऊही घरी नव्हता. यावेळी प्रणवने वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here