‘लग्नावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे मरणसंस्था : सलमान खान

0
284

मुंबई:
बॉलिवूडचा एवरग्रीन स्टार सलमान खान लग्न कधी करणार हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावंही जोडलं जातं. ईदच्या मुहूर्तावर तो ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सलमान मुलाखती देण्यात व्यग्र आहे. ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं.

‘लग्नावर माझा अजिबात विश्वास नाही. माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे मरणसंस्था आहे. मैत्रीबद्दल विचारत असाल तर हो, मला मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे,’ असं उत्तर सलमानने दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here