सांगलीत हरिपूर रस्त्यावर भरधाव ट्रकने सहा वर्षांच्या मुलीला चिरडले

0
87

सांगली:
हरिपूर रस्त्यावर शनिवारी रात्री एका भरधाव ट्रकने सहा वर्षांच्या मुलीला चिरडल्याची घटना घडली. यानंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रकच्या क्लिनरचा मृत्यू झाला. येथील लिंगायत स्मशानभूमीच्या परिसरात रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. या अपघातात सहा वर्षांच्या ऋचा झेंडे हिचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय ४५, रा. हरिपूर) याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक फरार झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here