संप काळात दोघींनी गाडी चालवली;महामंडळातर्फे सत्कार

0
239

मुंबई:
राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन आज (शनिवारी, १ जून २०१९) राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दोन एसटी महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

९ जून २०१७ रोजी राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले होते. एसटी डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. मात्र एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातील वाहक अनिता पाटील आणि जयश्री राऊत या दोन महिला कर्मचाऱ्यांनी कुणालाही न जुमानता प्रवाशांच्या सुविधेसाठी कोल्हापूर ते पुणे अशी बस सेवा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here