बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

230

कोल्हापूर, प्रतिनिधी : विभागीय क्रिडा संकुलच्या ठिकाणी ‘छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रिडा संकुल’ असा नामोल्लेख असणारा फलक लावण्यात यावा, या प्रमुख मागणी सह अन्य काही मागण्याचे निवेदन ‘बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती’चे अध्यक्ष रामेश्वर पतकी यांच्या वतीने सोमवरी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
गेली ८ वर्ष या संकुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु आहे, त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे या संकुलाचे बांधकाम जलदगतीने पुर्ण करण्यात यावे, तसेच संकुलात स्विमिंग पूल, फुटबॉल मैदान, टर्निंग ट्रक, बँँडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल ग्राऊंड ही सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत, ती त्वरित पुर्ण करावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तर या अपूर्ण कामाचा पाठपुरावा करण्या ऐवजी, येणारी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही नेते मंडळी श्रेयवादासाठी शिलालेख, भूमीपूजन अशा कार्यक्रमांंचे आयोजन करत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने यात लक्ष्य घालून याचे नामंकरण करण्यात यावे अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. तसेच या क्रिडा क्षेत्राचा विकास न करता निव्वळ राजकीय फायद्यासाठी कोणी या संकुलाचा गैरवापर केला तर बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने सर्व संस्था, संघटनांना घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशाराही या निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
यावेळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर पतकी यासह, किशोर घाटगे, राहुल चौधरी, चिन्मय ससाणे, धनाजी घोरपडे, अविनाश पवार, राम चव्हाण, सुनील हांकारे, संतोष बामणे, अजित ससाणे, सुजीत जाधव, राजू भोसले, मनोज पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.