भुदरगड पंचायत समिती मध्ये राडा अध्यक्ष्याच्या पुतण्याला मारहाण,महिला सदस्यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल

0
3636

गारगोटी-प्रतिनिधी:
भुदरगड पंचायत समिती वर आमदार प्रकाश अबीटकर यांची सत्ता आहे.तर विरोधी के पी पाटील व राहुल देसाई गटाचे सदस्य आहेत .पंचायत समिती मिटींग मध्ये महिला सदस्यांनाफ वारंवार अबीटकर गटाचे सदस्य सुनील निबालकर वारंवार महिलांना टोंत मारत होते अशी तक्रार महिला सदस्यांनी सभापती यांचेकडे केली .यावेळी आरोपी विद्याधर महादेव परीट हा सभापतीचा नात्याने पुतण्या आहे पण वारंवार पंचायत समिती मध्ये तो अरेरावीची भाषा करताना आढळत आहे अशी तक्रार महिला सदस्यानी केली आहे .
पंचायत समितीमध्ये वारंवार कामकाजात कायम तोंड घालत आहे.आकुर्डे पंचायत समिती सदस्या व भाजप महिला तालुका अध्यक्षा आक्काताई नलवडे व मडीलगे पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई ,गारगोटी पंचायत समिती सदस्या गायत्री संदेश भोपळे मासिक मिटींग असल्याने उपसभापती चेंबर मध्ये बचत गटाबाबत चर्चा करीत बसले होते.यावेळी आरोपी विद्याधर परीट त्या चेंबर मध्ये येऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण ,तुमची लायकी काय अशी महिला सदस्यांना धमकी दिली आहे.मीच सभापतींच्या कार्यभार सांभाळणार येथून पुढे मीच सांभाळणार असे कॉलर उडवत महिला सदस्यांच्या अंगावर धावुन आला.त्याच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरचा तपास पो हे कॉन्स्टेबल 306 गुरव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here