मुख्यमंत्री कार्यालयाकडून पवारांना भेटीसाठी वेळ नाही.

0
586

मुंबई:
दुष्काळ निवारणाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटून सरसकट कर्जमाफीची विनंती करणार आहेत. केंद्रात काळजीवाहू सरकार असल्यानं नवीन सरकार स्थापन झाल्यावर सरसकट कर्जमाफीची विनंती करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप पवारांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसला म्‍हणावे तसे यश मिळालेले नाही. तरीही शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी इंदापुरात सांगितले होते. पण अद्याप CMOकडून त्यांना वेळ देण्यात आली नसल्याने शरद पवार मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार हे निश्चीत झालेले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here