बेळगाव च्या नँशनल स्केटिंग स्पर्धेत सुमित सुभाष माने याला दोन रौप्य पदके.

0
138

गारगोटी -प्रतिनिधी
शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब बेळगांव च्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कु. सुमित सुभाष माने याने १४ वर्षे वयोगटात दोन रोप्य पदके मिळविली. याबध्दल त्यास त्याचे प्रशिक्षक श्री इंद्रजित मराठे,सौ. सायली मराठे, आई सौ सविता माने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सुमित हा आमच्या शेणगांव येथील कुमार भवन शेणगांव हायस्कूलचा विद्यार्थी असून यापुर्वी सुमित याने याच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता.शाळेत चांगली गुणवत्ता ठेवून स्केटिंग या क्रिडाप्रकाराची आवड जोपासत त्यामध्ये मेहनत घेत सुमित याने मिळवलेले हे मेडल त्याच्या कष्टाचे फळ आहे.गेल्या वेळी याच स्केटिंग च्या खेळात इंटरनँशनल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कु सुमित चे नांव नोंदले गेले आहे.सुमित च्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here