पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले अभिनंदन

0
163

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी अभिनंदन केले. इम्रान यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांच्या शांततेसाठी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे, असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच फोनवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here