मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

222

वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीनामा देत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कमलनाथ यांनी त्यांचा राजीनामा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवून दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक बाब्रीया यांनी ही माहिती दिली.