भरत जाधव ना व्ही शांताराम पुरस्कार, तर परेश रावल यांना राजकपूर पुरस्कार जाहीर

0
97

मुंबई:
राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिध्द अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here