काँग्रेस पराभवानंतर राहुल गांधी चा राजीनाम्याच्या तयारीत

0
260

नवी दिल्लीः सलग दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीच्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतरदेखील काँग्रेसच्या हाती फार काही हाती लागले नाही. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेस केवळ 50 जागांवर आघाडीवर आहे. या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here