आर – वन हेल्थ कार्डची २५ हजार नोंदणी

0
214

कोल्हापूर: समर क्राऊन परिवाराचा आर वन हेल्थ कार्ड हा प्रकल्प आहे. या हेल्थ कार्डची जाहीर नोंदणी सुरु होण्यापूर्वीच दोन हजारहून अधिक लोकांनी प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील किमान दीडशे गावातील पंचवीस हजार कुटुंबियांच्या नोंदणीसाठी यंत्रणा सुसज्ज झाली आहे.अशी माहिती संस्थेचे धीरज रुकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आर-वन हेल्थ कार्ड प्रभावीपणे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी हिंदी अथवा संमिश्र हिंग्लिश भाषेतील घोषवाक्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्यांनी आपली घोषवाक्ये बंद पाकिटातून समर क्राऊन सर्व्हिसेस तिसरा मजला मातोश्री प्लाझा व्हिनस कॉर्नर कोल्हापूर येथे आणून द्यावे अथवा WP 7720906789 या क्रमांकावर पाठवावीत असे ही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here