श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं पत्रकाराला मारहाण करणा-या सहा गावगुंडाना शिरोळ पोलीसांकडुन अटक

0
173

कोल्हापूर :- झी 24 तास वृत्तवाहिनीचे वरिष्ठ प्रतिनीधी प्रताप नाईक यांना नृसिंहवाडी इथल्या गावगुडांकडुन मारहान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इतकच नव्हे तर पत्रकार नाईक यांच्यासोबत असणाऱ्या पत्नी आणि आईला देखील गुंडानी धक्काबुक्की केलीय. या प्रकरणी शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गावगुंडाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असुन पोलीसांनी तपास करुन सहा जणांना आत्ता पर्यत अटक केलीय.
झी 24 तासचे वरिष्ठ पत्रकार प्रताप नाईक हे कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथं देवदर्शनाला गेले होते. दर्शन आटोपून गावातीलच सोमण हॉटेल इथं नाईक कुटुंबियांनी भोजन घेतलं. तिथून कोल्हापूरला येण्यासाठी निघाले असताना गावातील एका संशयित रस्त्यावर गाडी लावून पाय पसरून बसला होता; त्यावेळी नाईक यांनी संबधित व्यक्तीला पाय बाजूला काढण्याची विनंती केली.. त्यावेळी संशयित याने झी 24 तासचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.. नाईक यांनी यासंदर्भात संबधीत व्यक्तीला शिविगाळ का केली ? असा जाब विचारला. त्यावेळी संबधीत व्यक्तीने आणि उपस्थित मित्राने पुन्हा नाईक यांना शिवीगाळ केली; दरम्यान 20 ते 25 जण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यातील गाव गुडांनी प्रताप नाईक यांना मारहान करुन आई आणि पत्नीला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर प्रताप नाईक यांनी सहकुटुंब जावुन शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये संबधीत गावगुंडाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर कोल्हापूर प्रेस क्लबनं गंभीर दखल घेतली. कोल्हापूर प्रेस क्लबच शिष्टमंडळानं पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेवुन घडलेला प्रकार सांगीतला, त्याचबरोबर प्रताप नाईक यांना मारहान करुन आई आणि पत्नीला धक्काबुक्की करणा-या गावगुंडाच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरोळ पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरु केली असुन संबधीतांच्यावर कठोर कायदेशिर कारवाई केली जाईल असं शिष्टमंडळाला अश्वासन दिल.
दरम्यान शिरोळ पोलीसांनी या प्रकरणी तपास करुन नृसिंहवाडी इथले गावगुंड गुरुप्रसाद राजाराम चौगुले, अमोल सर्जेराव कोचरे, तुषार तानाजी निकम, बाळकृष्ण वसंत मोरे, आनंद अवधुत पुजारी, योगेश आनंदराव रोकडे यांना अटक केलीय. त्याचबरोबर यापुर्वी या गावगुंडानी काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास देखील शिरोळ पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here