गारगोटीत एका निवृत्त शिक्षकाला भरवस्तीत लुटले

0
1176

गारगोटी (प्रतिनिधी)गारगोटीतील बारदेस्कर पेट्रोल पंप हा तसा नेहमी गजबजलेला आणि वर्दळीचा भाग,वेळ दुपारी साडे चारची, एक सेवानिवृत्त शिक्षक या रस्त्यावरून चालत जर असताना दोन अज्ञात युवक दुचाकीवरून जवळ आले आणि त्यांनी शिक्षकाच्या वरच्या खिशात असलेला मोबाईल तसेच रोख रक्कम हिसकावून घेऊन धूम ठोकली,मोहन भिकाजी वर्धम वय वर्षे ६७ रा पाटगाव ता भुदरगड असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.
फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेनंतर
गारगोटीतही अशा घटना घडू शकतात,यामुळे भुदरगड तालुक्यात खळबळ माजली आहे.
परवा दुपारी मोहन वर्धम हे सेवानिवृत्त शिक्षकांच्या बैठकीस उपस्थित राहून पंचायत समिती कडून एस टी स्टँड कडे चालत चालले होते,बारदेस्कर पेट्रोलजवळ आलेनंतर दोन युवक दुचाकीवरून त्यांचेजवळ आले,व त्यांनी काही समजण्याच्या अगोदर त्यांनी शर्टाच्या खिशात ठेवलेला सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल, तसेच खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले,हाताच्या बोटामधील अंगठीही त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला,पण अंगठी लवकर निघाली नसलेने चोरट्यानी तेथून पोबारा केला,या घटनेनंतर संबंधित शिक्षक भांबावून गेले होतें, त्यांनी या लुटमारीची तक्रार भुदरगड पोलिसात केली नसलेने समजते,
पण कोल्हापूर नंतर अशा लुटीच्या घटना आता गारगोटीतही घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here