मेंहदी कला हातावर उमटणारी ध्येयवेडी तरुणी – मयुरी पाटील.

0
143

आजरा.संभाजी जाधव: आजरा तालुक्यातील हात्तीवाडे गावातील कु. मयुरी जोतिबा पाटील. ही तरुणी मेंहादीच्या कलेने नवरीला सजवणारी व लग्न म्हटले कि नवरा, नवरी यातील दोन्ही जोडीला मेंहदीने सजवणारी मयुरी हिचे नाव प्रथम घेतले जाते. आजरा – गडहिग्लज – चंदगड पंचकृषितील सह कोल्हापूर जिल्हातील लग्न – सोहळे विविध कार्यक्रमामध्ये पहिले अंग्रहाचे निमंत्रण आजही या कु. मयुरीला दिले. जाते. मराठी चित्रपटातील छोट्या पडद्यावर छोटीशी भुमिकेतही झळकणारी मयुरी परिस्थितीने मध्यमवर्गीय आहे. अल्प दरात नवरा – नवरीना शोभा वाढण्याचे काम म्हणजे एक प्रकारची सेवा करत आहे. या सेवेतुन मिळणाऱ्या रकमेतुन ती आपलं शिक्षण आठवी पासुंन टि. वाय. पंर्यत पुर्ण करत आई – वडिलांना हातभार लावते. आई – वडिल शेती हाच पांरपांरीक व्यवसाय करतात. आज बदलत्या युगात तरुण – तरुणाईला आदर्श घेण्या सारखे काम आपल्या कलेच्या माध्यमातुन हि तरुणी करत आहे. कोल्हापूर जिल्हातील ग्रामीन भागात तुन लहान – मोठ्या मेंहदी काढण्यास आमत्रंण येतात. वयाच्या १२ व्या वर्षी असताना मयुरीने हिने नवरीला उतकृष्ठ मेंहदी काढुन १० रु. बक्षिस मिळवुन आनंदी होणारी मयुरीला प्रोसाहन मिळत गेले. शाबासकीची थाप पाटीवर पडताच न थांबता मेंहदी, रांगोळी अशा कला जोपासत आज आपले टि. वाय. पंर्यतचे शिक्षण पुर्ण केल आहे. स्वता काम करुन त्याच पैशातुन शिक्षण घेणारी हि तरुणी भविष्यात उज्वल यश प्राप्त करेल. अतिसुंदर अशी मेंहदी काढत असल्याने अनेक ठिकाणाहून तीला चांगली बक्षीसे मिळाली आहेत तर रांगोळी स्पर्धेत अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवली आहेत. आशा कलाकारांनीही शासनाने प्रोत्साहन दिले पाहीजे. मयुरी पाटील. हिने तरुन – तरुणाईला संदेश देताना म्हणाली. आपल्या देवाने दिलेल्या कलेचा वापर आपन योग्य पध्दतीने उपयोग केला पाहिजे प्रत्येकाजवळ वेगवेगळी कला असतेच पण त्या दुरपयोग न करता आपल्या कुंटुबयासाठी व समाजाचे आपन काहीतरी देणे लागतो यासाठी कलेचा उपयोग केला पाहीजे. व यातुन अल्प दरात मी आज सेवा देत आहे. गेल्या १० वर्षात अनेक अनुभव आले. पण मोफत सेवेचे महत्त्व समाजात काही लोकांना न समजल्याने यासाठी मी अल्प दरात मेंहदी काढण्याची सेवा देत सद्याच्या तरुन – तरुणाईनी आपल्या अंगातील कलेला जागृत करुन ती कला आपल्यासाठी व समाजासाठी उपयोगात आणली पाहीजे.असा संदेश कु. पाटील हिने बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here