देशातील आरोग्य सेवेमध्ये सहकार क्षेत्राचे मॉडेल राबवले पाहिजे: अनिल काकोडकर

0
73

पुणे:
भारत आरोग्य क्षेत्रात खूप मागे आहे. या क्षेत्रात गुंतवणूक वाढत असली तरी कोणी त्यातील मूळ समस्येला हात घालत नाही ही या क्षेत्राची शोकांतिका आहे. जर सेवाभावी वृत्ती असेल तर ते क्षेत्र पुढे जाते. आरोग्य क्षेत्रात आणखी सक्षम करायचे असेल तर देशातील आरोग्य सेवेमध्ये सहकार क्षेत्राचे मॉडेल राबवले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘पद्मभूषण’ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

शुश्रूषा को-ऑपरेटिव्ह रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरामध्ये पार पडला. यावेळी डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here