“अहिल्या – झूंज एकाकी” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

253

मुंबई : साईश्री क्रियेशनची निर्मिती आणि रेड बल्ब स्टुडिओ प्रस्तुत आगामी चित्रपट “अहिल्या – झूंज एकाकी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव सुरु आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंटा वाढत आहे.
या चित्रपटामध्ये अहिल्या या व्यक्तीरेखेवर आधारीत चित्रपटाची कथा आहे. प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रीतम कागणे या अभिनेत्री ला नुकताच संस्कृती कला दर्पणचा “लक्षवेधी अभिनेत्री” हा पुरस्कार मिळाला तसेच “सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट” म्हणून या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. नोएडा येथील ग्लोबल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये “एक्सलंट मराठी फिल्म” हा पुरस्कार मिळाला. याच बरोबर जर्मनी येथे होहे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “उत्कृष्ट चित्रपट” म्हणून निवड झाली. यूके येथील पेंझॅन्स अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “बेस्ट फिचर फिल्म” म्हणून या चित्रपटाचा गौरव करण्यात आला.
या चित्रपटात प्रितम कागणे अहिल्येचा भूमिकेत असून रोहीत सावंत उदयोन्मुख कलाकार नायकाच्या भूमिकेत येतोय सोबत प्रिया बेर्डे, प्रमोद पवार, नुतन जयंत, निशा परूळेकर, मिलिंद ओक यांच्या भुमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे.