वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार

0
79

कराड : सुमारे दीडशे फूट उंच असलेल्या खुजगाव-शेडगेवाडी दरम्यानच्या वारणा जलसेतूवरून पडल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री एका अ‍ॅकॅडमीतील काही युवक व्यायामासाठी गेले असताना खिरवडे (ता. शिराळा) येथील काळूबाईच्या मंदिराकडील जंगलाच्या बाजूने मोठा आवाज आला. त्यामुळे संबंधित युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना वारणा जलसेतूवरून बिबट्या खाली पडल्याचे दिसले. युवकांनी तातडीने खुजगावचे वन कर्मचारी शिवाजी सावंत यांना घटनेची माहिती दिली. बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्या जागीच मृत झाल्याचे स्पष्ट झाले. दीडशे फूट उंचावरून पडल्याने आणि डोक्याला मार लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here