निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा

0
364

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली आहे. प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी राजीनामा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठीच या निवडणुकीत काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आंबेडकरी समाजाला वेगळे वळण मिळावे यासाठी 12 वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारले. मात्र भारिप सत्ता संपादनाचे खोटे स्वप्न दाखवत आहे, असं ते म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही. उलट ते भाजपला 7 ते 8 जागा जिंकूण देण्यास मदतच करतील, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here