दिल्ली:
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद असलेले घटनेतील कलम 370 आणि कलम 35 ए या कलामांचा फेरविचार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे. या कलमांच्या तरतूदीचा देशाला लाभ झाला की त्यातून त्या राज्याचे नुकसान झाले याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केले. त्या राज्यात केव्हा विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील असे विचारता ते म्हणाले की कोणत्या राज्यात कधी निवडणुका घ्यायच्या याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. तथापि तेथील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तेथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.