एकता बहुउद्देशीय समाजिक संस्थेतर्फे दिव्यांंगाना मदतीचा हात

0
197

कोल्हापूर : एकता बहुउद्देशीय समाजिक संस्थेतर्फे दिव्यांंगासाठी आर्थिक मदत म्हणुन स्वरगंध म्यूझीकल मंचचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शाहू स्मारक येथे रविवारी(दि. १९ मे) सायं. ५ वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये करोओके ट्रकवर गायक आपली कला सादर करतील. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा जबीन शेख यांनी कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेली १५ वर्ष विविध उपक्रमातून ही संस्था समाजिक कार्य करत आहे. गरीब, गरजू दिव्यांगाना या संस्थेतर्फे नेहमीच मदत केली आहे. पण समाजिक कार्याचा वसा घेतलेले आमचे हात अजुन बळकट व्हावे आणि मोठ्या स्तरावर मदत कार्य करता यावे, यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पुर्णपणे नि:शुल्क आहे. एखाद्याच दुखः आपण पुर्णपणे कमी करु शकत नसलो तरी त्याचा भार तरी कमी करता येतो, याच भावनेतून आम्ही दिव्यांगाना साथ देणे, समाजाशी असलेले त्याच नात घट्ट करने इतकाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी येवुन याचा लाभ घ्यावा आणि मनइच्छेेने ह्या दिव्यांगाना मदत करावी. असे आवाहन या संस्थे मार्फत करण्यात आले. या पत्रकार परिषदेला अध्यक्षा जबीन शेख यांच्या सोबत संस्थेचे राजेश लोकरे आणि प्रा. संजय नाखिल हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here